Bhosari News : महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – महिला दिनानिमित्त डॉ. गायकवाड डायबिटीस सेंटर, भोसरी येथे महिलांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर  आयोजित करण्यात आले. तसेच, कल्पतरू डायबेटीस ॲन्ड वेलनेस सेंटर तसेच लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. दोन्ही शिबिरात 175 महिलांनी लाभ घेतला. 
डॉ. गायकवाड डायबिटीस सेंटर भोसरी येथील शिबिराअंतर्गत महिलांचे रक्तशर्करा, रक्तदाब तपासणी, बॉडी मास इंडेक्स, बॉडी फॅट एनालिसिस आदी तपासण्या करण्यात आल्या. डॉ .अनु गायकवाड यांनी उपस्थित महिलांना मधुमेह संबंधी तसेच डॉ. गीतांजली गरुड यांनी मधुमेह व महिलांच्या समस्या यावर मार्गदर्शन केले .

यावेळी माजी आमदार विलास लांडे, गणेश शिंदे, डॉ.अनु गायकवाड, डॉ. गीतांजली गरुड, डॉ. रसिका पुणेकर, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. दामिनी जोंधळे व डॉ.गायकवाड डायबिटीस सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.
अहमदनगर येथील ख्यातनाम युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी विविध क्षेत्रातील उदाहरणे देत कुटुंबाचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे नमूद केले. या शिबिराचा शंभर महिलांनी लाभ घेतला.

तसेच, कल्पतरू डायबेटीस ॲन्ड वेलनेस सेंटर तसेच लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात महिलांच्या रक्तशर्करा, रक्तदाब ,बॉडी मास इंडेक्स, ईसीजी यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, 75 महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.
प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. अनु गायकवाड यांनी महिलांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण असून, उपस्थित महिलांना हृदयरोग टाळण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, व्यसन, ताणतणावाचे नियोजन, वजन नियंत्रणात ठेवणे यासोबत मधुमेह व हृदयरोग विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये डॉ. सुषमा कदम यांनी महिलांचे आरोग्य व आयुर्वेद यावर तसेच लायन डॉक्टर दिपाली कुलकर्णी यांनी आहारावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्ड याच्या ला. आहेर, ला. संगीता गायकवाड, ला. डाॅ. दीपाली कुलकर्णी, ला. जयश्री साठे, ला. तृप्ती शर्मा तसेच, विविध महिला पदाधिकारी आणि कल्पतरू डायबिटीस व वेलनेस सेंटर मधील कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.