Bhosari news : एमआयडीसी भोसरी पोलिसांनी महिलेचे हरवलेले दागिने परत मिळवून दिले

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका महिलेचे हरवलेले दागिने (Bhosari news)परत मिळवून दिले आहे.

 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.05 वा च्या सुमारास दिगंबर पाखरे यांनी राहत्या घरातून त्यांच्या पत्नीला  स्विफ्ट कारने  सेंट्रल मॉल शिवरस्ता येथे कामावर जाण्यासाठी सोडले होते. त्यांची पत्नी सरला पाखरे या तेथून पायी चालत कामाच्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांचे दहा ग्राम वजनाचे 53,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र कुठेतरी पडले आहे. त्यांनी त्याबाबत त्यांचे पती दिगंबर खरे यांना माहिती दिली. ते दोघे पती-पत्नी मंगळसूत्र हरवल्या बाबतची तक्रार करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गेले.

Pune : कलापिनीच्या पारितोषिक विजेते ‘सय सरी’ मुकनाट्याने जिंकली रसिकांची मने

 या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी त्याबाबत तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व तपास पथक यांना मंगळसूत्राचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस शिपाई भागवत , पोलीस शिपाई विशाल काळे यांनी फिर्यादी सोबत जाऊन दिगंबर पाखरे यांच्या राहत्या घरी ते त्यांची पत्नी सरला पाखरे ज्या ठिकाणी कामावर गेल्या त्या ठिकाणचे सीसीटीव्हीची पाहणी केली.

 त्यावेळेस ते मंगळसूत्र हे दिगंबर पाखरे यांनी त्यांची पत्नी सरला भाकरे यांना कामावर सोडण्यासाठी सेंट्रल मॉल, शिवरस्ता येथे त्यांची स्विफ्ट कार उभी केली होती त्या ठिकाणी मिळाले.ते सोन्याचे मणी मंगळसूत्र विवेक पाटील (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते पाखरे दांपत्याला(Bhosari news) सुपूर्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.