Bhosari News : रिव्हर सायकोलोथॉनला उत्सफूर्त प्रतिसाद, 12,000 सायकलपटूंचा सहभाग

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (रविवारी, दि.28) आयोजित रिव्हर सायकोलोथॉनला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. विविध ठिकाणाहूंन आलेले सुमारे बारा हजार सायकलप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती हा या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश होता.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून रिव्हर सायकोलोथॉनचा प्रारंभ भोसरीतील गावजत्रा मैदान येथून सकाळी 6 वाजता झाला. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने ही सायक्लोथॉन घेण्यात आली.

रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्प्यांत झाली. पहिला टप्पा लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सात किलोमीटर अंतर होते. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य – संतनगर – अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता. दुसरा टप्पा 15 किलोमीटर अंतराचा होता. अंकुशराव लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य क्रांती चौक – जय गणेश साम्राज्य – अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता.

तिसरा टप्पा 25 किलोमीटर अंतराचा होता. सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह – स्पाईन रोड – क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता. रिव्हर सायकोलोथॉनमध्ये सहभागी प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.