Pune News : ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली तिथे पुन्हा सुरू होणार मुलींची शाळा

एमपीसी न्यूज – पुण्यातील भिडेवाडा येथे 1948 मध्ये महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. तिथेच वरचे पाच मजले पुणे महापालिकेच्या वतीने ताब्यात घेऊन, शाळा बांधण्यात येईल. त्याच वास्तूत महापालिकेची मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.27) या संबंधीचे निर्णय घेतले असल्याचे भुजबळ म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 12 फुटाचा सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यास आजच शुभारंभ करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यात आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पुरस्कारार्थीं छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंकज भुजबळ, मध्यप्रदेश आमदार सिद्धार्थ कुशवाह, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रा. हरी नरके, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी उपस्थित आहे.

पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी फुलेवाडा आणि स्मारकाचे विस्तारीकरणासाठी लवकरच भूसंपादन करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल असे आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.