Bhosari News: तीन पत्ती जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

सात जणांवर गुन्हा दाखल; 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने नेहरूनगर, पिंपरी येथे सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि. 18) रात्री छापा मारून कारवाई केली. यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगार चालक मालक चिंतामण सुरेश चव्हाण (वय 37, रा. नेहरूनगर, पिंपरी), जुगार खेळी शेखर सुरेश मोहिते (वय 33, रा. पिंपरी), इसाक इकबाल सय्यद (वय 48, रा. कासारवाडी), रामकृष्ण उत्तमराव तुपे (वय 47, रा. भोसरी), सुनील मल्लीनाथ सोमासे (वय 46, रा. पिंपरी), राजेंद्र शंकर सोमासे (वय 46, रा. पिंपरी), आबासाहेब बापूराव तुपे (वय 37, रा. पिंपरी) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती मिळाली की, भीमराव भोसले चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे एका लोखंडी केबिनमध्ये काहीजण एकत्र जमून जुगार खेळत आहेत. त्यानुसार आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा विभागाला या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी रात्री साडेआठ वाजता छापा मारून कारवाई करत रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि सात मोबाईल फोन असा एकूण 56 हजार 80 रुपयांचा ऐवज जप्त केला.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.