Bhosari News : कोयत्याच्या धाकाने एकाचा मोबाईल आणि दुचाकी पळविली

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून घरी जात असलेल्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्याचा मोबाईल आणि दुचाकी पळविली. दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी ही जबरी चोरी केली. एमआयडीसी भोसरी येथे क्रांती चौकाकडे जाणा-या रस्त्यावर वंडर कार शोरूम समोर सोमवारी (दि.11) दुपारी 1.15 वा ही घटना घडली.

परेश राजु पाटील (वय 23, रा. रिवर रेसीडेन्सी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन अज्ञात चोरट्याविरोधांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे त्यांची दुचाकी (एमएच 12 डब्लु 8941) वरून घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन अनोळखी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. वंडर कार शोरूमच्या समोर त्यांना अडवून त्यांचा 5 हजार रूपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच, 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी देखील पळवली. अशी एकूण 30 हजार रूपयांची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.