Bhosari : एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी (Bhosari) कंपनी परिसरातून साहित्य चोरून नेणाऱ्यास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे.

अमिर ऊर्फ चप्या हुसेन शेख (वय 30, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी. मूळ रा. लिंकरोड, पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातील मरक्युरस वॉटर ट्रिटमेंट कंपनीमध्ये 16 मार्च रोजी पहाटेच्या वेळी कंपनीतील मटेरियल चोरून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी 18 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंमलदार भागवत शेप, नितीन खेसे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा पोलीस रेकोर्डवरील आरोपी अमिर याने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी 19 जुलै रोजी अमिर याला अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन अल्पवयीन (Bhosari) साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

PMAY : पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यास उरले अवघे चार दिवस

तसेच त्याने आणखी एक चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 12 हजार रुपये किंमतीची वायर जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, संजय जरे, स्वप्नील शेलार, गणेश बोऱ्हाडे, शरद गांधिले, राहुल लोखंडे, भागवत शेप, नितीन खेसे, अनिल जोशी, विशाल काळे, उषा होले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.