Bhosari : विलास लांडे यांच्या पदयात्रेला निगडीमध्ये महिलांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या निगडी येथील पदयात्रेला आज (मंगळवारी) नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत महिलांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक महिलेच्या हातात कपबशी चिन्ह असलेले फलक होते. महिलांचा मिळालेला हा प्रतिसाद पाहून विलास लांडे भारावून गेले.

माजी आमदार विलास लांडे हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील दादागिरीला कंटाळलेले भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही विलास लांडे यांच्या प्रचाराला लागले आहेत. लांडे यांच्या प्रचार पदयात्रांना मतदारसंघात नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लांडे यांनी मंगळवारी सकाळी निगडी, यमुनानगर आणि सेक्टर 22 येथे पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

लांडे यांच्या या पदयात्रेला महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक महिला हातात कपबशी चिन्ह असलेले फलक घेऊन पदयात्रेत सहभागी झाली होती. महिलांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे विलास लांडे हे भारावून गेले. त्यांनी या सर्व महिलांचे आभार मानून कपबशीच्या विजयावर या महिलांनी शिक्कामोर्तब केल्याचे लांडे म्हणाले.

या पदयात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. भोसरी मतदारसंघातील मनसेचे प्रत्येक कार्यकर्ता विलास लांडे यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. लांडे यांच्या या भव्य विजयात मनसेचा सिंहाचा वाटा असेल, असेही चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.