Bhosri : सदभावना रॅलीत सहभागी होत 75 ग्रामरक्षकांनी दिला शांततेचा संदेश

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व 75 ग्रामरक्षक दल सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी एमआयडीसी (Bhosri) पोलीस ठाणे हद्दीत सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.23) सायंकाळी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी  भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ चपाले, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, विभागीय अध्यक्ष सतीश देशमुख, संघटक लक्ष्मण इंगवले, राजेंद्र येळवंडे आदी उपस्थित होते.

 एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीपासून भोसरी विभागात स्पाईन रस्त्याने साधारण 3 किमी अंतरात ही रॅली झाली. यावेळी ग्राम रक्षक दलाचे 75 सदस्य त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

या प्रसंगी व पोलीस निरीक्षक शिवाजी  गवारे म्हणाले,”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात  आयुक्तालयाच्या सुचने अंतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस व ग्रामरक्षक सदस्य यांच्या संयुक्त सद्भावना दौडमुळे शहरात सामाजिक सलोखा निर्मितीला बळ मिळनार यात शंका नाही,  असे मत व्यक्त केले.

प्राधिकरण सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सद्भावना व सलोखा ठेवून शहराच्या विकासामध्ये अग्रेसर राहण्यासाठी आज सर्व ग्रामरक्षक सदस्य व पोलीस बांधव बांधील राहतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी आवारे यांनी केले आभार प्रदर्शन लक्ष्मण इंगवले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.