Bjp : पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ‘घर चलो’ अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या (BJP) भाजप निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती होताच अमित गोरखे यांनी घर चलो अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा आज (शनिवारी) कासारवाडीत शुभारंभ झाला.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने झालेली विकास कामे सर्व नागरिकांना कळावी. तसेच येणाऱ्या निवडणुकी साठी पक्ष संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने पिंपरी विधानसभा संघटन भाजपच्या कामांचा शुभारंभ कासारवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आला.

या नंतर परिसरातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटीचे घरोघरी भेटी चे नियोजन करण्यात आले.

माजी (BJP) नगरसेवक माऊली थोरात, कुणाल लांडगे,प्रकाश जवळकर, सुनील लांडगे,गजानन मोरे, सुरेश
गदिया, देवदत्त लांडे, संतोष टोणगे,गणेश जवळकर, हर्षल भोसले, गणेश संभेराव, सुहास जाधव , बापूसाहेब भोसले
बाळासाहेब लांडे, युवराज लांडे इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Maval : आदर्श माता अंजनाबाई म्हसे यांचे निधन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.