Muslim Truth Board : बकरी ईदच्या दिवशी रक्तदान मोहीम, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अनोखे अभियान

एमपीसी न्यूज – बकरी ईद अर्थात ईद-उल-अझा हा मुस्लिम धर्मीयांचा सण त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा आहे. यालाच कुर्बानीची ईद असेही म्हणतात. त्यामुळे या दिवशी विवेक आणि विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून रक्तदान अभियान राबविण्यात येणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून  (Muslim Truth Board)  समविचारी संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 10 ते 17 जुलै या कालावधीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

या रक्तदान मोहिमेची घोषणा करताना मंडळाने म्हटले आहे की, आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मीयांनी आपापले सण उत्सव समाज आणि मानवताभिमुख करणे आवश्यक आहे. संविधानाने अपेक्षित केलेल्या मूलभूत नागरिकतव्याचे पालन आणि सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य आहे.

 

Lonavala Rain : लोणावळ्याला पावसाने झोडपले;इंद्रायणीला पूर

 

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळ 2011 पासून बकरी ईद निमित्त रक्तदान आयोजित करत आहेत. याद्वारे जात धर्मापलीकडे जाणारा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. मुस्लिम बांधवांसोबत (Muslim Truth Board) धर्म जाती पलीकडे आणि मानवतेसाठी या राज्यव्यापी रक्तदान अभियानात सहभागी होऊन एकत्रितपणे विज्ञान विवेक आणि मानवतावादी संदेश जपण्याचा प्रयत्न केला जातो.

 

Sambhaji Brigade : CMO कार्यालयात पूजा, संभाजी ब्रिगेडकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध

 

 

येत्या 10 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड या कालावधीत रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील बॅरिस्टर नाथ पै सभागृह राष्ट्र सेवा दल साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा या ठिकाणी हा उपक्रम संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.