_MPC_DIR_MPU_III

Chakan : चाकणमध्ये स्टेशनरी दुकान फोडले

Break-in into stationary shop in Chikhali.

एमपीसी न्यूज – चाकण मधील श्री शिवाजी विद्या मंदिराजवळ असलेल्या सदगुरू स्टेशनरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली.

_MPC_DIR_MPU_IV

सतीश भाऊसाहेब घाडगे (वय 52, रा. दत्त मंदिराजवळ, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाडगे यांचे श्री शिवाजी विद्या मंदिराजवळ सदगुरू स्टेशनरी नावाचे दुकान आहे. त्यांचे दुकान 29 ऑगस्ट रोजी रात्री सात ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.