करणी केल्याच्या संशयावरून वहिनीचा निर्घृण खून

एमपीसी न्युज: करणी केल्याच्या संशयावरून आणि आईला भेटू देत नाही या कारणावरून दिरानेच वहिनीचा चाकूने गळा चिरून खून केला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

लक्ष्मीबाई श्रीराम (वय 54, रा. बिडी कामगार वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी श्रीनिवास श्रीराम याला अटक करण्यात आली आहे. सागर रमेश दासा (वय 39) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत लक्ष्मीबाई आणि आरोपी श्रीराम हे एकमेकांची नातेवाईक आहेत. लक्ष्मीबाई श्रीराम या शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सागर दासा यांच्या वडगाव शेरी येथील घरी परडी भरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी त्यांना बोलत असताना आरोपी श्रीनिवास श्रीराम याने त्या ठिकाणी येऊन पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला.

करणी केल्याच्या संशयावरून आणि आईला भेटू देत नाही या कारणावरून धारदार चाकूने त्यांचा गळा कापला आणि पोटावर ही चाकूने वार केले. या हल्ल्यात लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.