Pimpri News : अर्थसंकल्पात कष्टकरी ,कामगार बेरोजगारांच्या वाट्याला केवळ निराशा – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यात केवळ आकडेवारी दाखवण्यात येत असली तरी सर्वसामान्य, नागरिक, (Pimpri News) कष्टकरी, कामगार,बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी, मनरेगासारख्या योजना, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांची अपेक्षा होती, मात्र त्यांच्या वाट्याला काहीही आलेले नाही त्यांची घोर निराशा झाली आहे असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले आहे.

अर्थ संकल्पावर कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने अर्थ संकल्पाचे गुलाबी चित्र उभे केले आहे. देशात बेरोजगारीचा दर 8.3 % झाला. गेल्या तीन वर्षापासून अर्थव्यवस्थेला घसरण लागलेली असून आगामी वर्षात 6.5 टक्क्यांनी वाढणार आहे.

महागाई बेरोजगारीने कष्टकरी व गरीबाच्या हाता- तोंडाला घास येत नाही श्रीमंत श्रीमंत होतात गरीब गरीब होतात ही दरी कमी करण्यासाठी सरकार अपयशी ठरलेला आहे.ज्या योजनेचा लाभच होणार नाही अशा घटकांना लाभ देण्याचा घोषणांचा प्रयत्न सरकार करते आहे. गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटीची घोषणा केली मात्र जून 2015 ते 2022 पर्यंत सर्वांना घरे देऊन ही घोषणा निष्फळ ठरली अजूनही घरे मिळालेली नाहीत.

Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 15 रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार

कोरोना काळात 10 हजार लघु,सूक्ष्म,मध्यम उद्योग बंद पडलेले असताना त्यांना समजून घेऊन त्यांना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सरकारकडून झाले नाहीत उलट एम.एस.एम.ई उद्योगासाठी अर्ज केलेल्या हजारो अर्जदारांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.

 

फेरीवाल्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपयांची अपेक्षा होती मात्र 10 रू. कर्ज स्वरूपात दिले ते ही मिळत नाही.कोरोना मध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्याना नुकसान देण्याची घोषणाही पूर्वी प्रमाणे केवळ हवेतच विरणार असून, सरकारने कोरोना कालावधीमध्ये कामगारांना पगार (Pimpri News) कपात करू नये असे आदेश दिले मात्र ते पुन्हा परत घेतले.पि.एम. कौशल्य योजनेतून ही रोजगार उपलब्ध झाले नसताना पुन्हा अशा वेगवेगळ्या तरतूद करणे म्हणजे गुलाबी स्वप्न दाखवल्यासारखे आहे असं काशिनाथ नखाते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.