Pune : लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Pune) तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड पुकारून 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले असले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याबद्दल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकरानी मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी असा प्रश्न केला.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सरकारला येऊन वर्षपूर्ती होत आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अशी भूमिका यावेळी मांडली.

नेहमी प्रमाणे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले. परंतु, यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

शिंदे गटातील आमदारांकडे मंत्रीपदाची संख्या (Pune) कमी आहे. त्यामुळे अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

Maharashtra : बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी विरोध केला तुम्ही त्याच्या सोबत जाऊन बसलात – मुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.