Talegaon Dabhade : कॅन्सर विरोधात जनजागृतीसाठी रोटरी सिटी पिंकेथॉन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी जी एच, ओंको लाईफ कॅन्सर सेंटर व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने फाईट अगेंस्ट कॅन्सर – रोटरी सिटी पिंकेथॉन रॅली (Talegaon Dabhade) हा उपक्रम राबविला जाणार आहे. ही रॅली रविवारी (दि.19) सकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तळेगाव जनरल हॉस्पिटल ॲन्ड काॅन्व्हलसंट होमचे अध्यक्ष गणेश खांडगे, रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

यावेळी प्रकल्प प्रमुख रो डाॅ धनश्री काळे, सहप्रकल्प प्रमुख रो सुनंदा वाघमारे, पिंकेथाॅन समन्वयक डाॅ विद्या पोतले, चीफ ऑफिसर डाॅ मनोज तेजानी आदी उपस्थित होते.

 

तळेगाव शहर व मावळ तालुका पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी विजय सरनाईक, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे व रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी केले आहे. रॅलीचे मुख्य आकर्षण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते रॅलीचे उद्घाटन होणार आहे.

 

H3N2 : देशात इन्फ्लूएंझा H3N2 व्हायरसमुळे आतापर्यंत 9 मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार बैठक

 

ही रॅली 3 किलोमीटरची असून सुरुवात मारुती मंदिर चौक येथून सकाळी 7 वाजता होणार असून बाजारपेठ,गणपती चौक,शाळा चौक,जिजामाता चौक,स्टेशन रोड, स्टेशन चौक (Talegaon Dabhade) या ठिकाणाहून तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील टी जी एच ओंको लाईफ कॅन्सर सेंटर या ठिकाणी रोटरी सिटी पिंकेथाॅनचा समारोप होणार आहे तसेच कॅन्सर विरोधात जनजागृती करण्यासाठी या रॅलीमध्ये विविध माहितीपत्रके देण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांकडून  देण्यात आली.

 

मानवी जीवनाच्या बदललेल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे महिलांनी व्यायामाकडे लक्ष द्यावे तसेच रूग्ण,नातेवाईक व महिलांमध्ये कॅन्सर बाबतची भिती दुर व्हावी, जनजागृती व्हावी या उद्देशातून या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

 

या पिंकेथोन मध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना टी-शर्ट,टोपी,फिनिशर्स मेडल,पाण्याची व्यवस्था,ॲम्बुलन्स सपोर्ट व नाश्त्याची व्यवस्था व तळेगाव शहरातील नामांकित दुकानांमधील (Talegaon Dabhade) डिस्काउंट कुपन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे. प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.