Talegaon General Hospital : जनरल हॉस्पिटलमधील कॅन्सर सेंटरचे अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव जनरल हॉस्पिटल (Talegaon General Hospital) आणि कॉन्व्हेलसेंट होम यांचे -TGH – ONCO – LIFE कॅन्सर सेंटरचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि 11) रोजी होणार आहे. याबाबत तळेगाव जनरल हॉस्पिटलचे विद्यमान अध्यक्ष गणेश खांडगे यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार कृष्णराव भेगडे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, राजेश शहा, नितीन देसाई, चंद्रकांत गोग्री, अजित मुथा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कॅन्सर आजाराची दुर्मिळ तपासणी आणि उपचार या सेंटरमध्ये होणार आहे, याचा मावळ परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार होता. परंतु, प्रकृती अस्वस्थामुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याने हा नियोजित कार्यक्रम शुक्रवार (दि. 11) नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वा. तळेगाव जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

Pimple Gurav News: लेखनाला स्वानुभूतीची जोड हवी – प्रा. माधव राजगुरू

मावळ तालुक्यात नव्हे, तर राज्यामध्ये कॅन्सर आजाराची अत्यंत दुर्मिळ तपासणी (Talegaon General Hospital) करणारी यंत्रणा या ठिकाणी कार्यन्वित होणार आहे. त्यामुळे मावळवासीयांसह जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना याचा निश्चितच फायदा होईल असे मत सभापती शैलेश शहा यांनी व्यक्त केले. उद्घाटनाच्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह, उपाध्यक्ष दीपक शहा, उद्योजक रामदास काकडे, कार्यकारी संचालक उदय देशमुख, डाॅ. अशोक निकम, मानद सचिव डाॅ. सत्यजित वाढोकर, उपसभापती चंद्रभान खळदे, सचिव विनायक अभ्यंकर, डाॅ संजीव कडलास्कर, डाॅ. शाळीग्राम भंडारी, डॉ. शशिकांत पवार, हेमंत सरदेसाई, संजय साने, डाॅ. किरण देशमुख, सुखेंदु कुलकर्णी आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.