Tulsi Vivah : सामुदायिक तुळशी विवाह उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – दिवाळीचा दीपोत्सव शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून शहरात तुळशी (Tulsi Vivah) विवाह सुरू झाले. महात्मा फुले नगर, चिखली रोड, चिंचवड येथील मृगनयन हाऊसिंग सोसायटीमधील अंबाजी सावंत, तुकाराम कदम, बाळकृष्ण कदम यांनी तुळशी विवाह संपन्न केला. खंडू महाराज जोशी यांनी पौरोहित्य केले.

आकुर्डीगाव पंचतारानगर सातरज चाळ, नारायण कॉम्प्लेक्स येथे मनीषा लाटकर, रुक्मिणी गजरे, अर्चना चौधरी, शीतल गोसावी, प्रज्ञा स्वामी, उज्वला मराठे, पूजा साठे, पूनम नेमाडे, कमल जायगुडे या बचत गटातील महिलांनी तुळशी विवाहाच्या मंगलाष्टक गाण्यातून तुळशीची पर्यावरण महती विशद केली.

चिखली प्राधिकरणमध्ये गोमय दिवे लावून तुळशी विवाह – Tulsi Vivah 

चिखली प्राधिकरण सेक्टर 16 येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गोमय दिवे लावून सामुदायिक तुळशी विवाह संपन्न झाला. वृषाली शिंदे, मंगला नेहते, कविता लंगोटे, भागीरथीr पोळ, कमल पाटेवाड, प्रतिभा पोळ, रेश्मा भोंग, शितल हजारे, रंजना निकम या सेवेकरी महिलांनी मंगलाष्टके सादर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.