World adoption day : दत्तकत्व आणि बरच काही….

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती किंवा इतिहास पाहता मुल दत्तक घेणे ही काही नवीन बाब नाही, कारण अगदी कृष्ण, कर्ण असो किंवा शाहू महाराज असो, याबात आपण सर्वांनीच वाचले किंवा ऐकले आहे. तरीही आज मुल दत्तक कसे घेता येते, किंवा कोण मुल दत्तक घेऊ शकते, (World adoption day) दत्तक घेण्याची प्रक्रीया काय अशा प्रश्नांची उत्तरे खूप कमी लोकांना माहिती आहेत. याच कारण आहे या सगळ्या प्रक्रीयेबद्दल जागृकतेचा अभाव. या गोष्टीवर आज बोलण्याचे कारण आज म्हणजे 9 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक दत्तकत्व दिन म्हणून साजरा केला जातो.

या विषयावर पुण्याती पत्रकार व लेखिका कल्याणी सरदेसाई यांनी चाईल्ड ऑफ माय हर्ट नावाचे खूप सुंदर पुस्तक लिहले आहे. यामध्ये मुल दत्तक घेणे या विषयावर 360 अंशात प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकातील विश्लेषणामुळेच अवघ्या दोन वर्षात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे. यावरून हे लक्षात येते की खूप जणांना दत्तक प्रक्रीयेबद्दल सोप्या शब्दात आणि योग्य ते जाणून घ्यायचे आहे.

याविषयी एमपीसी न्यूजतर्फे कल्याणी सरदेसाई यांच्यासोबत मुक्त संवाद साधण्यात आला. या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, की ”मुल दत्तक घेणे ही प्रक्रीया वाटते तितकी सोपी आणि सहज नाही, कारण या साऱ्या प्रक्रीयेमधून मी जेव्हा गेले, तेव्हा मला जाणवले की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तर किती प्रश्न आणि शंका असतील. हे सार सोपं होण्यासाठी त्यांच्यापर्यंत दत्तक प्रक्रिया पोहचणे गरजेचे आहे. (World adoption day) कारण आज घडीला देखील भारतात एक गरज किंवा निकड म्हणून या विषयाकडे पहायचे झाले, तर दत्तकत्वासाठी उपलब्ध मुले 3 हजार असली तरी त्यासाठी अर्ज कऱणाऱ्या पालकांची संख्या ही 30 ते 40 हजार असते. याचा अर्थ असा नाही की अनाथ किंवा गरजू मुले कमी आहेत तर याचा अर्थ असा आहे, की किती मुले कायदेशीर किंवा नियमांना धरून दत्तक प्रक्रीयेत सामिल होऊ शकतात. कारण दत्तक प्रक्रीयेच्या दुसऱ्या बाजूला अनाथ आश्रमात किंवा बालगृहात सामिल होणाऱ्या मुलांची तसेच बालकांच्या तस्करीचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. हीच बाब लक्षात घेऊन मी 2020 साली माझ ‘चाईल्ड ऑफ माय हर्ट’ हे पुस्तक लिहले. जे नागरिकांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक ठरणारे आहे.

Pimple Gurav News: लेखनाला स्वानुभूतीची जोड हवी – प्रा. माधव राजगुरू

या पुस्तकात अगदी कोणी मुल दत्तक घ्यावे, ते कसे घ्यावे, त्याची प्रक्रिया काय, भारतात यासाठी काय धोरणे आहेत. त्याचा खर्च किती, तुमच्याकडे काय क्षमता हव्या आहेत, मुल दत्तक घेतल्यानंतर पुढे काय या साऱ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. भारतामध्ये सध्या दत्तक घेणे ही प्रक्रिया केंद्रीकृत झाली असून भारत सरकारच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे. (World adoption day) बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 अंतर्गत स्थापित, CARA भारतामध्ये आणि बाहेर दोन्ही दत्तकांचे निरीक्षण आणि नियमन करण्यासाठी जबाबदार आहे. या कायद्यामुळे काय झाले तर तुम्ही दत्तक घेत असताना सरकार तुमची पात्रता, गरज किंवा तुम्ही किती पातळीपर्यंत दत्तक मुलाचे पालकत्व स्विकारू शकता? हे पहाते. तसेच, मुल दत्तक घेत असताना भारतात सर्वत्र आता 40 हजार ही ठराविक रक्कमच भरावी लागते. ठराविक कागदपत्रेच तुम्हाला सर्वत्र द्यावी लागतात. त्यात कोणताच बदल नसतो, आधी जे अंडर द टेबल होत होते ते सर्व आता कायदेशीर व ओव्हर द टेबल झाले आहे असे मला वाटते.

तसेच, तुम्ही अर्ज केल्यानंतर आता तुम्ही केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून कोठूनही मुल दत्तक घेऊ शकता. याचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. कारण पालकांना काही वेळा सुमारे तीन ते चार वर्ष वाट देखील पहावी लागते.  असे असले तरी मी हेच सुचवेन की वेळ लागला, कितीही आडेवेढे आले तरी कायदेशीर प्रक्रीयेनेच मुल दत्तक घ्या.

कायदेशीर बाबी बरोबरच भावनीक बाजूबद्दल बोलताना कल्याणी सरदेसाई म्हणाल्या की, तुम्ही प्रेम देण्याच्या किंवा घेण्याच्या परिस्थीतीत असाल तरच दत्तक प्रक्रियेचा विचार करावा. कारण दुर्दैवाने आजही काही पालक दत्तक तर घेतात पण मुल सांभाळण्यास आम्ही समर्थ नाही, म्हणून ते पालक मुलांना परत सोडून जातात. तर, काहीजण केवळ उपकार किंवा समाजसेवा म्हणून मुल दत्तक घेतात. हे फार दुर्दैवी आहे.

तुम्हाला पालकत्व हवे असेल तरच मुल दत्तक घ्या. भावनिकते बरोबरच तुम्ही आर्थिकदृष्ट्याही सक्षम असणे गरजेचे आहे. कारण मुल दत्तक घेताना त्याची आर्थिक जबाबदारीही पालकांना स्विकारावी लागते, असेही कल्याणी सरदेसाई यांनी सांगितले. (World adoption day) कल्याणी सरदेसाई यांच्या पुस्तकांच्या खरेदीची सर्व रक्कम ही आनाथ आश्रमांना दिली जाते. जेणे करून दत्तक प्रक्रियेला व संबंधित संस्थांना मदत पोहचवली जाते. तुम्हालाही शंका असतील तर नक्की या पुस्तकाद्वारे त्या दूर करा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.