Dehuroad Crime : देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रारदार पार्ट्यांचा गोंधळ अन आत्महत्या करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – आरोपी हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी (Dehuroad Crime) आले होते. मात्र, त्यांनीच देहुरोड पोलीस ठाण्यात गोंधळ घालत वरीष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांना शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.8) देहुरोड पोलीस ठाण्यात घडला.

या प्रकऱणी पोलिसांनी विक्रम विजय स्वामी (वय 31 रा. देहुरोड) याला अटक केली असून दोन महिला आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे त्यांच्या ओळखीचे शहानुर काझी व त्याची पत्नी यांच्यात वाद होते. यावरून काझी व त्याच्या पत्नी विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांची तक्रार एकूण घेतल्यानंतर देहुरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

दोन्ही बाजू ऐकून घेत पाटील यांनी काझी यांना उद्या सकाळपर्यंत त्यांची (Dehuroad Crime) टपरी काढण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी टपरी काढून घेण्याचे कबुलही केले. तसेच, काझी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल कऱण्यात आला. तसेच, दोन्ही पार्ट्या या हिंदू मुस्लीम असल्याने त्यांना पोलिसांच्या वतीने सीआरपीसी 149 अतंर्गत नोटीस देण्यात आली. मात्र, आरोपी यांनी ती नोटीस न घेता पोलीस ठाण्यात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

World adoption day : दत्तकत्व आणि बरच काही….

तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही काझीवर कारवाई का नाही करत म्हणत आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची धमकी दिली. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, आत्महत्येची धमकी देणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढिल तपास देहुरोड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.