Bhosari News : भोसरी येथे कार चालकास मारहाण करत लुटले, दोन जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दोन अज्ञात दुचाकी स्वारांनी कारच्या काचा (Bhosari News) फोडून कार चालकास मारहाण करत लुटल्याची घटना भोसरी येथे मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी घडली आहे.

याबाबत कुणाल कांबळे, वय 23 वर्षे, इंदिरा वसाहत, वाल्मिकी चौक, औंध पुणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात दोन इसमांच्या विरोधात भा.द.वि कलम 394, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 6 डिसेंबर 22 रोजी पहाटे 2:45 च्या सुमारास लांडेवाडी चौकाच्या पुढे नाशिक पुणे हायवे भोसरी येथे घडली आहे.

Dighi News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

फिर्यादी हे त्यांच्याकडे असलेल्या मारुती सुझुकी एर्टिगा कार मधून घरी जात असताना आरोपींनी वेगवेगळ्या दोन टू व्हीलर गाडी वरून पाठीमागून येऊन हातातील रॉडने गाडीच्या मागील बाजूची काच फोडली. त्यामुळे फिर्यादी यांनी गाडी थांबवली असता कारची पुढील बाजूची काच फोडून (Bhosari News) त्यांच्या हातामधील लोखंडी रोडने फिर्यादी यांच्या डोक्यात, हातावर पायावर व पाठीवर मारून जखमी करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पैशांचे छोटे पाकीट व आठ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.