Bhosari News : विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा (Bhosari News) मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्यांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

अल्ताफनबी शेख (वय 27) याला अटक केली असून नवी इस्माईल शेख (वय 50) व पाच महिलां आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan News : दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी मे 2022 पासून फिर्यादीचा छळ करत होते. चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ करत होते.(Bhosari News) तसेच हाताने मारहाण करुन शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक छळ करत क्रुर वागणूक दिल्याची तक्रार विवाहितेने दिली असून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.