Chakan : चाकूचा धाक दाखवून आजारी महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – आजारी असल्याने घरात झोपलेल्या महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे 23 मार्च 2019 रोजी सकाळी घडला. याबाबत 2 नोव्हेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात त्या इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिरामण दौंडकर (रा. कडाचीवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आजारी असल्याने त्यांच्या घरात झोपल्या होत्या. आरोपीने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवला. या धाकाने फिर्यादी महिलेवर हिरामण याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने पीडित महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत महिलेने बलात्कार, विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.