Chakan : कुरुळी येथील कंपनीत आग; अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – चाकणजवळ कुरुळी येथे एका कंपनीत आग लागली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी घडली. मात्र, आगीचे नेमके कारण आणि जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी कुरुळी येथील एका कंपनीमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच चिखली, भोसरी, तळवडे अग्निशमन उपविभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. क्षणात आग भडकली. तसेच धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत उडाले.

सुरुवातीला अग्निशमन विभागाच्या जवानांना आग विझवताना अडचणी आल्या. रात्री साडेआठपर्यंत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण आणि जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.