Chakan : माहेरहून 15 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण करून तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी देत तिचा छळ केला. ही घटना खेड तालुक्यातील माळवाडी काळूस येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती गुरुदेव पोपट गायकवाड, सासरे पोपट नारायण गायकवाड, सासू तुळसाबाई गायकवाड, दीर अवधूत पोपट गायकवाड (सर्व रा. माळवाडी काळूस, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012 ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत आरोपींनी पीडित महिलेकडे माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी केली. ‘माहेरहून पैसे आणले नाहीत तर मी दुसरे लग्न करीन’ अशी आरोपी पतीने धमकी दिली. विवाहितेने माहेरहून पैसे आण्यासाठी नकार दिला असता तिला वारंवार उपाशी ठेवून तसेच मिळेल त्या वस्तूने मारहाण केली. दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली. सासूने घरगुती आणि शेतातील काहीही काम येत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत विवाहितेने चाकण पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.