रविवार, जानेवारी 29, 2023

Chakan fraud : आयुर्वेदिक जडीबुटी विक्रीच्या बहाण्याने चार लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज : लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल अशा बहाण्याने जडीबुटीची विक्री करून चार लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.(Chakan fraud) ही घटना 9 मे ते 28 ऑगस्ट या कालावधीत माणिक चौक चाकण येथील कृष्णा आयुर्वेदिक जडीबुटी भांडार येथे घडली.

अश्विनी दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेमराज उमाजी गोसावी (वय 19), संजीव लिंबाजी गोसावी (वय 30), विश्वजित लिंबाजी गोसावी (वय 22, रा. चाकण), या तिघांना अटक केली असून डॉ. रमेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet injection fraud : अमेरिकेतून इंजेक्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना चार लाख रुपयांची आयुर्वेदिक औषधे दिली. त्याचा फिर्यादी यांना काहीही परिणाम झाला नाही.Chakan fraud) आरोपींनी फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल अशा बहाण्याने गंडा घातला आहे. पोलिसांनी प्रेमराज, संजीव आणि विश्वजित या तिघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Latest news
Related news