Chakan : कोरेगाव खुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- नेहमीच दुसऱ्यासाठी जगणाऱ्या महिलांनी स्वतः साठी एक आनंदाचा क्षण अनुभवावा या उद्देशाने ग्रामीण भागात महिला व मुले सर्वाथाने सक्षम व्हावीत म्हणून काम करणाऱ्या वर्क फॉर equality या सामाजिक संस्थेने शिंडलर इंडिया प्रा.ली. कंपनीच्या सहकार्याने महिलांसाठी विवीधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे टाटा आटो कॉम कंपनीचे महेश पवार, प्रभा जाधव, कोरेगावचे सरपंच कैलास गावळ, ग्रामसेविका फुलपगारे,राजुबाई शाळेच्या शिक्षिका डोखे मॅडम, पोलीस पाटील दीपाल दौंद, शाळा कमिटी अध्यक्ष दत्तात्रय पठारे, सीमा तेली, विद्याताई उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुलींचा लहान वयात होणारा विवाह शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या, एका लग्नाची गोष्ट” या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सोबतच ग्रामीण विभागात मुलींच्या शिक्षणाला समाजाचा, घराचा विरोध पत्कारून सहकार्य करणाऱ्या 20 महिलांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांसाठी मनोरंजनाचे खेळ व पुरस्कार देखील दिले गेले.

सूत्रसंचालन कल्याणी दौंद, प्रिया दौंद व जयश्री गावडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.