Chakan : कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी सभा; पोलीस पाटलासह 14 जणांवर गुन्हा दाखल

Chakan: Police file charges against 14 people including police patil for taken public meeting in the period of corona सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर, सभा घेण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले असून टाळेबंदीही जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीचे देखील आदेश आहेत. असे असताना गावातील पोलीस पाटलानेच एक सभा घेतली. तसेच कोणतीही सुरक्षा बाळगली नाही, याबाबत पोलीस पाटलासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश वसंत अरगडे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. त्यांच्यासह राहुल खैरे, संदीप दत्तात्रय पोटवडे, दशरथ खैरे, सोपान पोटवडे, अनिल अरगडे, बबन मह्डू अरगडे, केशव बबन अरगडे, गणेश बबन गायकवाड, हिरामण पोटवडे, गणपत अरगडे, वसंत मारुती अरगडे, महेश खलाटे, काळूराम खैरे (सर्व रा. काळूस, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माजी पोलीस पाटील संदीप किसन पवळे (वय 42, रा. काळूस, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टाळेबंदी आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर, सभा घेण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.

असे असताना खुद्द पोलीस पाटलाने काळूस गावात सभा घेतली. या सभेसाठी कोणीही सुरक्षित अंतराचे पालन केले नाही. तसेच सुरक्षेसाठी मास्क व अन्य बाबींची पूर्तता केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.