Chakan Traffic Update : चाकणच्या अंतर्गत रस्त्यांवर प्रंचड रहदारी; महामार्ग मोकळे

एमपीसी न्यूज – चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना दिवाळीची सुट्टी लागल्याने खरेदीसाठी चाकण बाजारपेठेत सोमवारी (दि. २४) सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर वाहनचालकांनासह पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीला (Chakan Traffic Update) सामोरे जावे लागले. 
रस्त्यावरील अतिक्रमणे, अस्ताव्यस्त पार्किंग अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडली. त्यामुळे चाकण पोलीस प्रशासनाने काही भागात चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.  दरम्यान तुलनेने दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे येथील राष्ट्रीय महामार्गांवर काहीसा शुकशुकाट (Chakan Traffic Update) पहावयास मिळत होता.

दिवाळीच्या खरेदीसाठी कामगार वर्गाची  बाजारपेठेत खरेदीची धांदल दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. रांगोळी, पणत्या, रोषणाई व फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडला. त्यामुळे शहरात मोठी गर्दी होऊन चाकणची बाजारपेठही वाहतुकीच्या कोंडीत अडकली .
पोलिसांच्या उपाययोजना 
चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर कोंडी (Chakan Traffic Update) झाली होती.  दुचाक्यांसह अनेकजण चारचाकी वाहने घेऊन खरेदीसाठी आल्याने कोंडीत आणखी भर पडली. खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी चाकण पोलिसांनी सोमवारी (दि.२४) येथील माणिक चौकातून शहरात येणाऱ्या चार चाकी वाहनांना बंदी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.