Diwali Sweets : तळेगावात जनसेवा विकास समितीच्या वतीने नागरिकांना मिठाई वाटप

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन विभागात दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मिठाईचे (Diwali Sweets) वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

दीपावली हा उत्साहवर्धक प्रेरणादायी व चैतन्य निर्माण करणारा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आजूबाजूला दिव्यांचा जल्लोष होत असताना मनामधील अंधकार दूर होऊन उत्साहाची नवचेतना निर्माण व्हावी यासाठी जनसेवक समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत, असे नगरसेवक रोहित लांघे यांनी यावेळी नमूद केले.

Kalapini Diwali Pahat : स्वरदीपांनी उजळली कलापिनीची दिवाळी पहाट

जनसेवा जेष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी एकमेकांना मिठाई (Diwali Sweets) भरवून आनंद व्यक्त केला. दरवर्षी न विसरता किशोर  आवारे आम्हा सर्व नागरिकांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करतात हे त्यांच्यामधील एक असामान्य कर्तृत्व असून त्यांना आम्ही आमच्या कुटुंबातीलच एक भाग मानतो, असे वक्तव्य जनसेवा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय साबळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.