Talegaon Dabhade : शासकीय फलकावर बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिराती

तक्रार करूनही नगरपरिषदेचे सोयीस्कर दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – तळेगाव चाकण रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालये असून त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या प्रबोधनासाठी फलक उभारले आहेत. या फलकावर परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकाने अतिक्रमण केले असून त्याने त्यावर जाहिराती लावल्या आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी नगर परिषदेकडे तक्रार देखील केली. मात्र या तक्रारीकडे नगरपरिषद प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

तळेगांव चाकण रस्त्यावर तळेगांव दाभाडे येथे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेत,इंद्रायणी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालय, कृष्णराव भेगडे स्कुल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असून त्यात एकूण दहा  हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘सावधान पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा’ असे फलक लावले आहेत, परंतु एका बिल्डरने आपल्या गृहप्रकल्पाची मोफत जाहिरात करण्यासाठी याच शासकीय फलकाचा उपयोग करून आपले जाहिरात फलक याच बोर्डावर लावून स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात केली आहे.

Ramdas Kakade : जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका काँग्रेसतर्फे रामदास काकडे यांचा सत्कार

अशा फुकट जाहिरात करणाऱ्या फुकट्या बिल्डरवर कारवाई करावी, असे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करूनही आज देखील हा फलक दिमाखात उभा आहे. याचा अर्थ दोन्ही यंत्रणा संबंधित जाहिरातदारांना सामील असाव्यात, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या फलकांवर आणि फलक लावणाऱ्या बिल्डरवर कारवाई होईल का, असा सवाल करण्यात येत आहे.

शासकीय फलकांवर नेते आणि खाजगी व्यावसायिकांचे अतिक्रमण

अनेक ठिकाणी शासकीय फलकांवर स्थानिक नेत्यांनी आपल्या वाढदिवस आणि इतर उपक्रमाचे आणि फुकट्या जाहिरातदारांनी आपल्या व्यवसायांचे जाहिरात फलक शासकीय फलकांवर लावल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी असे तक्रारीत डोळस यांनी म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.