Ramdas Kakade : जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका काँग्रेसतर्फे रामदास काकडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – जेआरडी टाटा उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे (Ramdas Kakade) यांचा मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. रामदास काकडे बहुआयामी व्यक्तिमत्व असून उद्योग सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापार औद्योगिक, वैद्यकीय, क्षेत्रात त्यांचा ठसा उमटलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर यांनी केले आहे.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड. खंडू तिकोणे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज,मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, तळेगाव स्टेशन कार्याध्यक्ष योगेश पारगे, तळेगाव स्टेशन युवक अध्यक्ष समीर दाभाडे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळूंज आदी मान्यवर उपस्थित होते. तळेगाव युवक कार्याध्यक्ष राम शहाणे, ॲड. निवृत्ती फलके, सुभाष बुटाला, सरपंच अनंता मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयडीसीमध्ये भरीव कार्य त्यांच्या हातून झाले आहे. तसेच इंद्रायणी महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे देखील काम रामदास काकडे यांच्या हातून झाले आहे.

पुणे शहराच्या धर्तीवर विविध शैक्षणिक उपक्रम इंद्रायणी महाविद्यालयात राबवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील दुर्गम विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाल्याचे यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले आहे. राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील आरएमके उद्योगसमूहाचे तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे (Ramdas Kakade) यांना जाहीर झाला आहे.

9 ऑगस्ट रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात उद्योग समूहाचे माजी वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या उपस्थितीत तर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे निवड समितीने कळविले आहे.

जिद्द, सचोटी, प्रामाणिकपणा, कौशल्यपूर्णता, तत्त्वनिष्ठता या पंचसूत्रींवर आधारित गेली तीन दशके प्रयत्नपूर्वक काकडे (Ramdas Kakade) यांनी आपल्या उद्योग विश्वात, तसेच इंद्रायणी महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तळेगाव दाभाडे येथे प्रशस्त व सर्व सुविधा संपन्न असे कॅन्सर हॉस्पिटल उभारणीमध्ये देखील रामदास काकडे यांनी महत्वपूर्ण हातभार लावलेला आहे. काकडे यांच्या समग्र कार्याचा गौरव टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन करण्यात येणार असल्याने तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.