Chakan : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 15 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन (Chakan)चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 15 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

योगेश तुकाराम देवकर, दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या (Chakan)माहितीनुसार, चाकण परिसरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे एक वाहन चोरी विरोधी पथक तयार करण्यात आले.

या पथकाने वाहन चोरी होणाऱ्या घटनास्थळावरील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण करत दोघांची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी योगेश देवकर आणि दत्तात्रय गाडेबैल या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील सात, दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.