Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द

एमपीसी न्यूज – सुनील केदार यांची आमदारकी (Sunil Kedar)रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे.

त्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने राजपत्र काढण्यात आलं आहे. यात सुनील केदार यांची आमदारची रद्द केली असल्याचा उल्लेख आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे (Sunil Kedar)आमदार आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.  दोन दिवसांआधी नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जास्तकाळाची शिक्षा सुनावली गेली. तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. या नियमानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.