Delhi : कुस्ती महासंघाच्या संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीचं केंद्र सरकारकडून निलंबन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा ( Delhi ) करणे घाईचे ठरले आहे. तसेच स्पर्धा जाहीर करताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही,असे आरोप करत भारतीय कुस्ती महासंघाच्या संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीचं केंद्र सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. यांच्या निवडीअंतर्गत स्थापन झालेल्या कमिटीला केंद्र सरकारने निलंबित केलं आहे. तसंच, संजय सिंह यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. संजय सिंह यांनी अध्यक्षपदी निवड होताच नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर 15 आणि अंडर 20 खेळाडूंची स्पर्धा घोषित केली होती. यावरून कुस्तीपटू साक्षी मलिकनेही जाहीर टीका केली होती. त्यानंतर, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने  राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करणे घाईचे ठरले आहे .  तसेच स्पर्धा जाहीर करताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही.

Chakan : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 15 दुचाकी जप्त

ही प्रक्रिया नियमांच्या विरुद्ध आहे. स्पर्धा जाहीर करताना खेळाडूंना किमान 15 दिवसांचा अवधी देणे गरजेचे आहे.“असे निर्णय (होल्डिंग नॅशनल) कार्यकारी समितीने घेतले पाहिजेत, त्याआधी अजेंडा विचारात घेणे आवश्यक आहे. ‘मीटिंग्जसाठी सूचना आणि कोरम’ या शीर्षकाखाली WFI घटनेच्या कलम XI नुसार, कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी 15 दिवसांची पूर्वसूचना देणे आणि समितीत एक तृतीयांश प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. तर, आपत्कालीन परिस्थिती निदान सात दिवसांची पूर्वसूचना देणे गरजेचे असते, असं मंत्रालयाने ( Delhi ) नमूद केलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.