Mahrashtra News : चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांतदादांनी अमित शाह यांना माहिती दिली, असं भाजप कार्यालयाने सांगितलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

असे सांगण्यात येत होते की, अमित शहा नोव्हेंबर अखेरीस पुण्यात येतील आणि पुणे महानगरपालिकेच्या काही नवीन प्रकल्पांचं उद्घाटनं करतील. महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहांच्या हस्ते होणार अशी बातमी होती. यावेळी शहा यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडेल, असंही म्हटलं जात होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.