Chakan News : चासकमान धरण ओव्हर फ्लो; विसर्ग सुरु 

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान  धरण हे 100 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भिमानदी पाञात 925  क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठावरच्या नागरीकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.

चासकमान धरण व भिमाशंकर परिसरात पाऊस सुरूच असल्याने,  चासकमान  धरण 100 टक्के भरले असून आहे. बुधवारी दि. 4 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 925 क्युसेक्स विसर्ग सांडव्याद्वारे भीमानदीला  सोडण्यात आला आहे.  धरणातील पाण्याची आवक वाढल्यास  वेळोवेळी  आदेशानुसार सांडवा विसर्ग वाढवण्यात येईल सर्वांनी नोंद घ्यावी . भिमानदी पात्रात कोणीही जाऊ नये तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

कळमोडी धरण नुकतेच म्हणजे 21 जुलै 2021 रोजी शंभर टक्के भरले होते. या धरणातून होणाऱ्या विसर्गातून येणारे पाणी चासकमान धरणात येत होते. त्यामुळे चासकमान धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास मदत झाली. मागील वर्षी चासकमान धरण 30 ऑगस्ट 2020 रोजी 100 टक्के भरले होते. यंदा दमदार पावसाने धरण तुलनेने 25 दिवस लवकरच भरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.