Chakan News : अकरा जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई

सहा अल्पवयीनांचाही समावेश ; चाकण पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : संघटित रीत्या टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या चाकण मधील टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये अकरा जणांचा समावेश असून त्यातील 6 जन अल्पवयीन असल्याची माहिती चाकण पोलिसांनी मंगळवारी (दि. 3 ऑगस्ट ) दिली आहे.

चाकण मध्ये टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी संदीप शिंदे यांच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. चाकण येथील संदीप अरुण शिंदे  (वय 43, रा. मेदनकरवाडी, चाकण  ) ओंकार मनोज बिसणारे ( वय 20, रा. चाकण ) निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे ( वय 20, रा. खंडोबा माळ , चाकण  ) नामदेवउर्फ नाम्या प्रकाश नाईक ( वय 21, रा. वाकी खुर्द, ता. खेड) हर्षद संदीप शिंदे  ( वय 22 रा. मेदनकरवाडी, चाकण ) आणि चाकण मधील खंडोबामाळ परिसरात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात ही मोक्का कारवाई करण्यात आली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी दिली आहे.

या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर मारहाण, गर्दी मारामारी, दरोड्याची तयारी ,वाहनांची जाळपोळ ,बेकायदेशीर अग्नी शस्त्र बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  त्यानुसार ती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अनिल देवरे, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.