चिकन, मटण, अंडी, मासळीचे दर स्थिर

एमपीसी न्यूज – गणेश पेठेतील मासळीबाजारात बोंबील, बांगडा, कोळंबी अन् सुरमईच्या मोठ्या स्वरुपात दाखल होत आहे. यामध्ये, लहान आकाराचे मासे जास्त असल्याने त्यांच्या दरात घसरण झाली आहे. उर्वरित मासळीचे दर स्थिर आहेत. तर, चिकन, मटण व अंड्याचे भावही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 16) खोल समुद्रातील मासळीची 15 ते 20 टन, खाडी 400 ते 500 किलो, नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

इंद्रायणी नदीत आढळलेल्या महिलेचा खून, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1400-1500, मध्यम : 900-1000, लहान : 700-800, भिला : 500-550, हलवा : 480-550, सुरमई : 360-550, रावस : 600, घोळ : 600, करली : 280, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 300-360, पाला : 700-1200, वाम : 200-600, ओले बोंबील : 50-180. कोळंबी : लहान 120-280, मोठी : 320-550, जंबोप्रॉन्स : 1000-1200, किंगप्रॉन्स : 700-800,  लॉबस्टर : 1600-1800, मोरी : 160-280, मांदेली : 80-160, राणीमासा : 100-140, खेकडे : 250-300, चिंबोर्‍या : 450-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 160-200, खापी : 140-180, नगली : 360-480, तांबोशी : 300-400, पालू : 200-240, लेपा : 200-240, बांगडा : 50-160, शेवटे : 160-200, पेडवी : 80-100, बेळुंजी : 100-140, तिसर्‍या : 240, खुबे : 100-120, तारली : 120-160. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 400-480, शिवडा : 200-280, खवली : 240-280, आम्ळी : 120-180, खेकडे : 320-360, वाम : 480-550. मटण : बोकडाचे 680, बोलाईचे 680, खिमा 680, कलेजी 720. चिकन 220, लेगपीस 270, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 320. अंडी : गावरान (शेकडा) 910, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 473, डझन 66, प्रतिनग 5.50.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.