Chikhali : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – डंपरच्या धडकेत दुचाकीवरून   (Chikhali ) जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. हा  अपघात मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडला.

दिलीप लक्ष्मण घोटकुले (वय 85, रा. ताथवडे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. निखील दिलीप घोटकुले (वय 33) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/जीयु 4617) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलेस अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील दिलीप घोटकुले हे दुचाकीवरून स्पाईन रोड, चिखली येथून जात होते. पवार वस्ती उड्डाण पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत  (Chikhali ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.