Chikhali : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे उद्या रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – चिखली मोरेवस्ती येथे निरंकारी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या वतीने रविवारी (दि. ४ ऑगस्ट) रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

चिखली मोरेवस्ती येथील महानगरपालिका शाळा नं.९२ ,साने चौक ,मोरेवस्ती ,चिखली या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन झोन पुणे ब्रँच भोसरी अंतर्गत मोरेवस्ती तर्फे विशाल रक्तदान शिबिर रविवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ८ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

  • रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले पंधरा दिवस संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक-सेवादल मोरेवस्ती ,चिखली परिसरातील मॉल, चौक तसेच घरा-घरात, जाऊन संवाद साधून तसेच नुक्कड नाटिका सादर करून रक्तदानाचे महत्व समजावून सांगत आहे.

संत निरंकारी मंडळाचे भोसरी सेक्टर संयोजक अंगद जाधव यांनी रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like