Chikhali : बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कर्जाची थकबाकी असल्याने (Chikhali) बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) चिखली येथील चिखली- आकुर्डी रोडवर घडली आहे.

याप्रकरणी मनिष सुरेश वारके (वय 38 रा. सांगवी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून घनश्याम प्रभाकर कानडे , संदीप प्रभाकर कानडे, दत्तात्रय प्रभाकर कानडे व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : नदी पात्रातील डासांच्या थव्यावर महापालिका ड्रोनद्वारे करणार फवारणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष याचे संदीप बॅग हाऊस नावाने दुकान आहे. या व्यवसायाकरीता मनीष व इतर आरोपींनी त्यांचे घर फायनान्स कंपनीकडे तारण म्हणून ठेवले होते. यावेळी त्याने वेळेवर हप्ते न भरल्याने बँकेने (Chikhali) हे तरण घर जप्त करत ते सील केले. यावेळी आरोपीनी कोणती ही परवानगी न घेता मालमत्तेमध्ये प्रवेश करत आदेशाचा भंग केला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.