Chikhali : चिखली कुदळवाडी उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवारवस्तीतून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या उड्डाणपूलाला बकालपणा आला असून त्याचे विद्रूपीकरण होऊ नये, उड्डाणपूल चांगला दिसावा, यासाठी उड्डाणपुलाच्या बाजूला सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, तसेच उड्डाणपुलाच्या भिंतीवर समाज प्रबोधनात्मक रंगचित्रे रेखाटण्यात यावीत. जेणेकरून नागरिकांना सामजिक भान जपता येईल. तसेच उड्डाण पुलाखालील अंडरपासही सुशोभित करून त्याठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तसेच उड्डाणपुलाची निगा राखण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.