Chikhali : सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणा-या नराधमावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सहा वर्षीय चिमुकली ट्युशन वरून येत असताना तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी आठच्या सुमारास चिखली येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात 45 वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन सर्जेराव काळोखे (वय 45, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या 34 वर्षीय आईने चिखली पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षीय मुलगी मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास ट्युशनवरून घरी येत होती. सोसायटीच्या लिफ्टमधून घरी येत असताना लिफ्टजवळ थांबलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितला असता आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.