Chinchwad : घरफोडी करत चार तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज – घराचा कडीकोयंडा तोडून घरातून 41 ग्रॅम वजनाचे 68 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 28) पहाटे बिजलीनगर चिंचवड येथे उघडकीस आली.

रवींद्र शांताराम महाजन (वय 40, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे अडीच ते दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी रवींद्र यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 41 ग्रॅम वजनाचे 68 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.