Chikhali News : नवदुर्गा सखी मंचच्या मोफत कोविड रुग्णवाहिकेचे लोकार्पण

एमपीसीन्यूज : पांडाभाऊ साने युवा मंच आणि नवदुर्गा सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका प्रभाग क्रमांक एकमध्ये आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या रुग्णाविकेचे आज, सोमवारी लोकार्पण करण्यात आले.

चिखली-मोरेवस्ती येथील अंगणवाडी चौकात हा लोकार्पण सोहळा पार पडला. चिखली येथील कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरु केल्याबद्दल आमदार लांडगे यांनी पांडुरंग साने आणि रुपाली साने यांचे कौतुक केले.

गरजू नागरिकांच्या सोयीसाठी साने चौक येथे ही रुग्णवाहिका उपलब्ध होईल, असे रुपाली साने यांनी सांगितले.

यावेळी फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, सागर हिंगणे, भाजपा युवा नेते पांडा साने, नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली साने, सूर्या हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय सूर्यवंशी, डॉ. अमोल बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते माणिक,   माजी नगरसेवक सुनील लोखंडे, तुकाराम जाधव, संतोष मोरे, चांगदेव मोरे, रवी जांभुळकर, रमेश सांगडे, गणेश अवचिते उपस्थित होते.

दिगंबर साने, कुलदीप साने, अभिजीत साने, रवी साने, आनंद साने यांच्यासह पांडाभाऊ साने युवा मंच आणि नवदुर्गा सखी मंचच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

भाजप युवा नेते पांडुरंग साने यांनी आभार मानले.

चिखली मोरेवस्ती भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काही रुग्णवाहिका चालक रुग्णांकडून जादा शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोफत कोविड रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.

रुपाली साने : संस्थापक-अध्यक्षा नवदुर्गा सखी मंच.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.