Chikhali News : चिखली मोरेवस्ती येथे शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी

एमपीसीन्यूज : शिवसेना चिखली-मोरेवस्ती शाखेच्यातीने आज, बुधवारी साने चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले.

शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सर्जेराव भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आनंद हिंगे, चंद्रकांत जाधव, सतिश डिसले, संजय गाढवे, हरीभाऊ लोकरे आदी उपस्थित होते.

गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेच्यावतीने येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने व कोरोनाबाबत शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवप्रेमींना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आल्याची माहिती नेताजी काशीद यांनी दिली.

दरम्यान, दिवसभरात शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, सुमन तांबे, दादाराव ठाकरे, आबा पांचाळ, बापू कापसे,  विक्रम छाजेड, अशोक गायकवाड आदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.