Chikhli : चिखली-पिंपरीगाव पीएमपी बस बंद

एमपीसी न्यूज – कोणतीही पूर्वकल्पना न देता पीएमपीएमएल प्रशासनाने चिखली ते पिंपरीगाव ही बससेवा बंद केल्याने चिखलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही बससेवा पूर्ववत करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महापालिका क्षेत्रीय समितीचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.

यासंदर्भात दिनेश यादव यांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिखली गावातून येणारी बस कुदळवाडी, पवार वस्ती, मोरे पाटील चौक, केएसबी, मोरवाडी चौक, मनपा चौक ते पिंपरी गाव या मार्गावर ही बस धावत होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता ही बस बंद करण्यात आली. त्यामुळे कुदळवाडी भागातील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, दूग्ध व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.