Chikhali : मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण देणारे संतपीठ अद्वितीय माध्यम – शेखर सिंह

एमपीसी न्यूज – संगीत वाद्यांच्या कंपनामधून निघणार्‍या लहरींचा मोठा (Chikhali) परिणाम जीवनावर होत असतो. त्यामुळे ती कंपने आपण दिर्घकाळापर्यंत जपून ठेवली पाहिजेत. ‘संतपीठ हे मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण देणारे अद्वितीय माध्यम ठरेल’ असे विचार महापालिकेचे आयुक्त तथा चिखलीतील संतपीठाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

महापालिका संचलित चिखलीतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ येथे मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा संतपीठाचे संचालक ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. माजी महापौर उषा ढोरे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त तथा संतपीठाचे संचालक ह.भ.प. डॉ. अभय टिळक, वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्थ ह.भ.प. दिनकर शास्त्री भुकेले आदी उपस्थित होते.

अभय टिळक यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा आलेख मांडत असताना ” भक्ती हा संतांच्या जीवनाचा प्राण असला तरी त्या भक्तीला ज्ञानाच अधिष्ठान असलेल्या निरंतर शिक्षणाचे उगमस्थान किंवा उर्जाकेंद्र म्हणजे संतपीठ असेल” असे गौरवोद्गार काढले.

‘मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाच्या माध्यमातुन लहान थोरांना अध्यात्मिक व्यासंग प्राप्त होणार आहे. अध्यात्मिक शिक्षण देणारे टाळगांव चिखली येथे साकारले गेलेले संतपीठ याचा एक आदर्श नमुना ठरेल, असे ढोरे म्हणाल्या. आमदार महेश लांडगे यांनी दुरभाष्य प्रणाली द्वारे आपला शुभेच्छा संदेश पाठविल्या. मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाच्या (Chikhali) उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे विस्वस्त दिनकर शास्त्री भुकेले यांनी देखील सर्व उपस्थितांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात या संकल्पनेस शुभेच्छा दिल्या.

सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘ देहू- आळंदी परिसरातील टाळगांव चिखली हे विशेष पारमार्थिक क्षेत्र असुन टाळगांव चिखलीमध्ये संतपीठामध्ये मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाची संकल्पना राबवली गेल्याने सांस्कृतिक व पारमार्थिक संगम होणे शक्य होणार आहे’ असे विचार प्रगट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी सांप्रदायाचा गाभा असलेले पंचपदी भजन संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजु महाराज ढोरे यांच्यासह मुक्त सांप्रदायिक संगीत विभागाच्या सर्व संगीत शिक्षकांनी सादर केले. मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणासाठी प्रवेश नोंदविलेल्या प्रथम दहा भाग्यवान विजेत्यांना तुकाराम महाराजांची मुर्ती, शाल व श्रीफळ देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Pune : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे उद्घाटन

माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, दिनेश यादव, संतोष मोरे, वृक्ष प्राधिकरन समितीचे सदस्य आनंदा यादव, टाळगांव चिखली प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष रोहिदास मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मळेकर, विनायक मोरे, तसेच संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक ह.भ.प. राजु ढोरे यांच्यासह संतपीठ सांस्कृतिक, चिंतन, अभ्यासक व सल्लागार समितीचे सदस्य तसेच टाळगांव चिखलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतपीठाचे अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांनी केले. तर, संतपीठाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहल पगारे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.