Chinchwad : बीएसएनएल लॅण्डलाईन सेवा विस्कळीत

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील बीएसएनएल लॅण्डलाईनची सेवा गेल्या चार दिवसापांसून ठप्प आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.

चिंचवड गावात बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्यामुळे ज्या ग्राहकांकडे बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन आहे. त्या ग्राहकांना जास्त मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी असणारे नागरिक, विद्यार्थी हे बीएसएनएलचे ग्राहक असल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे.

  • याबाबतीत बीएसएनएलचे वरीष्ठ अधिकारी अरविंद वडेनरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एमएसईबीचे बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले आहे. येत्या दोन ते चार दिवसांत सेवा पूर्ववत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.